राज्यातील समग्र शिक्षा अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी दिनांक 11 डिसेंबर रोजी विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला होता. गेल्या 15 ते 20 वर्षापासून कंत्राटी पद्धतीने तुटपुंज्या मानधनावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शासन सेवेत नियमित करण्याच्या प्रमुख मागणीसाठी नागपूर येथे सुरु असलेल्या विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला होता.
$ads={1}
समग्र शिक्षा अभियानाच्या कर्मचाऱ्यांचा विधानभवनावर मोर्चा
समग्र शिक्षा अभियानाची सुरुवात सन 2000 काळापासून झाली आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद, मुंबई 1994 च्या सेवा शर्तीची हमी देऊन या अभियानात राज्यस्तर ते केंद्र स्तरापर्यंत विविध पदे निर्माण करण्यात आली, यानंतर या अभियानाला गतीने सुरुवात होऊन अभियानातील करार कर्मचारी आपापल्या पदाला शोभेल असे निययमावली नुसार सर्व कामे आणि त्याही नंतर कामातून समाज उभा राहावा, म्हणून पदा व्यतिरिक्तही निर्माण होणारी वेळेवरची इतर कामे करून पदाला न्याय देण्याचे दृष्टीने आणि गुणवत्ता वाढ करत असतानाच प्रत्येक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात सामील करून घेऊन तो आला पाहिजे, टिकला पाहिजे आणि शिकला पाहिजे या उद्देशाने प्रत्येक घटक कार्यरत राहिला.
म्हणूनच या अभियानात समाविष्ट झालेला शाळाबाह्य विद्यार्थी सुद्धा शिकू शकला आणि त्याचा परिणाम देश पातळीवर महाराष्ट्र राज्याचा गुणवत्तेचा PGI इंडेक्स अत्यंत शोभनीय दिसू लागला. मात्र शोभा ज्यांच्यामुळे आली तो शोभा आणणारा घटक मात्र काही प्रमाणात आजही उपेक्षित आहे, हे आवर्जून सांगावे लागते.
महाराष्ट्रातील वाढलेली गुणवत्ता म्हणजे हे समग्र शिक्षा अभियान मधील कर्मचाऱ्यांची मेहनत आहे. शासनाचे विविध योजनेची अंमलबजावणी करणे, शिक्षण विभागातील संपूर्ण कामे करणे याच कर्मचाऱ्यावर अवलंबून असतात, तरीसुध्दा सदर कर्मचाऱ्यांना पंधरा वीस वर्षे सेवा झाल्यानंतर सुद्धा इतर कर्मचाऱ्या प्रमाणे कोणत्याही सुविधांचा लाभ मिळत नाही.
अनेक कर्मचाऱ्यांची कुटुंबे सेवा करता करता उध्वस्त झाली आहेत. ती या जगातून सुद्धा निघून गेली आहेत. त्यांची कुटुंब उघड्यावर पडली आहेत उदरनिर्वाह कसा चालवावा हा सुद्धा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. दिनांक १२/१२/२०१२ ला आताचे मा. उपमुख्यमंत्री व त्यावेळी विरोधी पक्षात असलेले माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आमच्या मोर्चाला मार्गदर्शन करताना आमचे सरकार आले म्हणजे आम्ही आपणास पहिल्याच कॅबिनेटला कायम करू असा शब्द दिला होता. तेव्हा या मोर्चाचे नेतृत्व तेव्हाचे भाजपाचे अध्यक्ष व आताचे माननीय वनमंत्री मा. नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनीच केले होते.
समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचारी यांच्या मोर्चातील निवेदनात असलेल्या प्रमुख मागण्या
- समग्र शिक्षा मधील विविध पदावर कार्यरत करार कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करून मानवी दृष्टिकोनातून शासनातील विविध पदावर कायम स्वरूपी समायोजन करण्यात यावे
- भरती प्रक्रिया करते वेळी 1994 च्या सेवा शर्तीनुसार भरती प्रक्रिया राबवली होती. त्यामध्ये वर्षातून एकदा कर्मचाऱ्यांची मानधन वाढ करावी असे नमूद आहे, तरी मागील पाच-सहा वर्षापासून मानधनात वाढ करण्यात आली नाही, त्यामुळे प्रती वर्ष 10 टक्के प्रमाणे 60% मानधन वाढ करण्यात यावी
- भरती करते वेळेस याच कर्मचाऱ्यांसोबत निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती, त्यांच्याकडून 65 वर्षापर्यंत सेवा करून घेतली त्यानुसार या कर्मचाऱ्यांना सुद्धा 65 वर्षे पर्यंत सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी व 58 वस्न 65 वर्ष वयोमर्यादा वाढविण्यात यावी.
- समान काम, समान वेतन लागू करण्यात यावे.
- निवृत्तीनंतर किमान कुटुंब चालेल एवढे निवृत्ती मानधन देण्यात यावे. ६) समग्र शिक्षा मध्ये काम करत असताना जे कर्मचारी मृत्यू पावले त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्यात यावी.
- मरण पावलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात यावी
- समग्र शिक्षा कर्मचारी यांना वैद्यकीय उपचारा करीता झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ति करण्यात यावी.
- समग्र शिक्षा कर्मचारी यांना वैद्यकीय उपचार काळातील सुट्टया हया पूर्ण वेतनी रुपाने मंजूर करण्यात यावेत.
- समग्र शिक्षा मधिल प्रत्येक कर्मचारी यांना निवृत्ती नंतर 10 दहा लाख रुपये देण्यात यावे.
- विशेष शिक्षक यांचे वेतन विद्यार्थी संख्येनुसार ठरवले जाते त्यामुळे इतर केडरप्रमाणे त्यांची वेतनवाढ होण्यासाठी अडचण होते त्यांनाही इतर केडरप्रमाणे वेतन निश्चिती केल्यास ब-याच वर्षापासून त्यांची होणारी पिळवणूक थांबविण्यात यावी.
वरील निवेदनातील सर्व बाबींचा विचार करून तसेच मानवीय दृष्टिकोनाचा विचार करून एक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने समग्र शिक्षा करार कर्मचारी यांच्या न्याय मागण्या मंजूर कराव्या, अशी विनंती समग्र शिक्षा करार कर्मचारी श्रमिक संघाने सरकारकडे केली आहे.
आनंदाची बातमी! करार तत्वावरील कर्मचारी शासन सेवेत नियमित$ads={2}
तलाठी भरती महत्वाचे प्रसिद्धी पत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य विद्युत विभागात मोठी भरती जाहिरात पहा