Internship Opportunity : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात आंतरवासिता (इंटर्नशिप)उपक्रमाची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
शासनाच्या योजना, ध्येय-धोरणे, मंत्रिमंडळ निर्णय, उपक्रम यांना प्रसिद्धी देण्याचे काम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे करण्यात येत असते. यामध्ये मुद्रित, दृक श्राव्य, वेब, समाज माध्यम अशा विविध माध्यमांचा वापर करण्यात येतो. या सर्व बाबींचा जवळून अभ्यास करण्याची संधी या उपक्रमाद्वारे उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
$ads={1}
या उपक्रमाची अधिक माहिती खालीलप्रमाणे
- आंतरवासिता (इंटर्नशिप)उपक्रमाचा कालावधी 3 महिन्यांचा असेल.
- विद्यार्थ्यांना त्यांच्या कलानुसार विविध शाखांमध्ये काम देण्यात येईल. (मुद्रित माध्यम, दृकश्राव्य, सोशल मीडिया, प्रकाशने, व्हिडीओ एडिटिंग, तंत्रज्ञान विषयक बाबी इत्यादी)
- सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी कामकाजाची वेळ असेल. मात्र, संबंधित शाखेच्या कामकाजानुसार ती बदलू शकते. शनिवार व रविवारी साप्ताहिक सुट्टी असेल.
- विद्यार्थ्यांना यासाठी कोणत्याही प्रकारचे मानधन, प्रवास भत्ता अथवा निवास व्यवस्था सुविधा देय असणार नाही.
- विद्यार्थ्यांच्या कामकाजाचा दरमहा आढावा घेण्यात येईल. एखाद्या विद्यार्थांचे काम असमाधानकारक आढळल्यास त्याचा कार्यकाळ तातडीने संपुष्टात आणण्यात येईल.
मोठी अपडेट! आरोग्य विभाग भरती परीक्षेचे सुधारित वेळापत्रक पहा
राज्याच्या उत्पादन शुल्क विभागांतर्गत मेगाभरती
अर्ज कोठे करावा?
इच्छुकांनी आपल्या विभागप्रमुखांच्या मान्यतेने संशोधन अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, १७ वा मजला, नवीन प्रशासकीय भवन मंत्रालयासमोर, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई -३२ येथे बंद पाकिटात अर्ज सादर करावा. अर्जासोबत पदवी प्रमाणपत्राची प्रत व सध्या शिकत असलेल्या अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयीन ओळखपत्राची प्रत जोडावी. पाकिटावर इंटर्नशिपसाठी अर्ज असा स्पष्ट उल्लेख करावा.
$ads={2}
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ८ डिसेंबर २०२३ ही असेल. या उपक्रमासंदर्भातील सर्वाधिकार माहिती व जनसंपर्क महासंचालनालय राखून ठेवले आहे.
$ads={2}
कर्मचारी अपडेट्स - कंत्राटी कर्मचारी महत्त्वाचे अपडेट - सरकारी कर्मचारी बातम्या - सरकारी नोकरीच्या संधी